“मला गोळी मारली जाऊ शकते”, भर सभागृहात छगन भुजबळांचा खळबळजनक दावा

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात वाद सुरू आहेत. छगन भुजबळांच्या प्रत्येक उत्तराला मनोज जरांगे आक्रमक प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. अशातच नुकताच छगन भुजबळांनी खळबळजनक दावा केला आहे की, मनोज जरांगे त्यांचा कार्यक्रम करणार आहेत. आपल्याला गोळी मारली जाण्याची भीती भुजबळांनी व्यक्त केली आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, “मी आता त्याचा कार्यक्रम करतो असं मनोज जरांगे म्हणतात. म्हणजे माझा कार्यक्रम करणार. त्यानंतर अचानक माझी पोलीस सुरक्षा वाढवली. मी कारण विचारलं असता वरून इनपूट आल्याचं सांगण्यात आलं. मला गोळी मारली जाऊ शकते असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. त्यामुळे सुरक्षा वाढवली.”

“भुजबळ मराठ्यांचा विरोधक आहे अशी प्रतिमा तयार केली जात आहे. मला सर्वच समाज समान आहे. भुजबळ हा मराठा विरोधक म्हणून प्रतिमा तयार केली जात आहे. मराठा आरक्षणाचा कायदा दोन वेळा आणण्यात आला, त्याला मी पाठिंबा दिला. ओबासी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या असं सर्वजण बोलतात, मात्र मग भुजबळच टार्गेट का?” असा सवालही छगन भुजबळांनी केला.

महत्वाच्या बातम्या-