‘पार्थ पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ, ते राजकीय स्थिरतेच्या शोधात आहेत’

मुंबई – राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोड्या करताना पाहायला मिळत आहेत. यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे आता पुन्हा चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार गेले होते.

पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांचा शासकीय बंगला असलेल्या पावनगडवर जाऊन देसाई यांची भेट घेतली. यावेळी पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट चर्चा झाली. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट का घेतली? (Why did Partha Pawar meet Shambhuraj Desai?) तसेच या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.

पार्थ पवार शिंदे गटाच्या नेत्याची भेट घेत असल्याने पडद्यामागे नेमकं काय घडत आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. पार्थ पवार हे काहीसे बंडखोर स्वभावाचे आहेत त्यामुळे या भेटीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, पार्थ यांनी थेट शिंदे सरकारमधील मंत्र्याची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Partha Pawar meets Shambhuraj Desai; Will there be a political earthquake?).

दरम्यान दुसरीकडे भाजप नेते गोपीचंद पडळकर (BJP leader Gopichand Padalkar) यांनी या भेटीबाबत मोठा दावा केला आहे. पार्थ पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर ते राजकीय स्थिरतेच्या शोधात आहेत, त्यामुळे त्यांनी देसाई यांची भेट घेतल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.