बाळासाहेबांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच; एकदोन नव्हे तब्बल  40 सरपंचांचा पक्षप्रवेश

Mumbai – बाळासाहेबांच्या शिवसेनेत विविध पक्षातून नेते दाखल होण्याचा ओघ सुरूच आहे. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) पाथरी तालुक्यातील 40 सरपंच, उपसरपंच, सभापती, पंचायत समिती सभापती, ग्रामपंचायत सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी Social Media वर पोस्ट करत माहिती दिली आहे. ज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष सरपंचांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुंजाभाऊ टाकळकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रमोद पाटील यांचाही यात समावेश आहे.

याशिवाय माजी नगराध्यक्ष मोईन अन्सारी, माजी उपनगराध्यक्ष युसूफ अन्सारी, नगरसेवक नामदेव चिंचाणे, शंकर चिंचाणे, परभणीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, मावळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश नवघरे, परभणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ साखरे पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मानवत पंचायत समिती सभापती शिवाजी उक्कलकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. याप्रसंगी त्यांचे स्वागत करत या सर्वांना भावी सामाजिक तसेच राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे.