‘नितेश राणे  हा बुद्धी भ्रष्ट झालेला भाजपचा आमदार’

Nitesh Rane –  ठाकरगट आणि आमदार नितेश राणे यांच्यात शीतयुद्ध सुरूच असल्याचे चित्र आहे. यातच आता राणे यांनी केलेल्या नव्या दाव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.  अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडणार असल्याची शक्यता असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी वर्तविली आहे. इतकंच नाही तर त्यांनी हा त्यांच्यावर आरोप केलाय.

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचा नेता शरद कोळी यांनी नितेश राणे बुद्धी भ्रष्ट झालेला भाजपचा आमदार असल्याचे म्हणत सडकून टीका केली. दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे आज न् उद्या अडचणीत येणार, असल्याचे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हा हल्लाबोल केला आहे.

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला..

दरम्यान,  नितेश राणे बुद्धी भ्रष्ट झालेला भाजपचा आमदार असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचा घणाघातही त्यांनी केला. भाजपची सुपारी घेऊन नितेश राणे ठाकरेंवर आरोप करताय. उद्धव ठाकरे अशा खालच्या स्तरावर जात नसून तुम्ही गुन्हेगार आहात, असा हल्लाबोलही शरद कोळी यांनी केलाय.