अनिल परबांच्या अडचणी वाढणार? आयकर विभागाच्या धाडीत मोठं घबाड मिळाल्याचा भाजप नेत्यांचा दावा

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर ईडी आणि आयकर विभागाकडून कारवाईचे सत्र सुरू आहे. अशातच 8 मार्च रोजी आयकर विभागाने (income tax department) राज्यात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. मुंबईसह राज्यभर 26 ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये राज्यातील शिवसेनेचा (shivsena) एक मोठा नेता आयकरच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान,युवा सेना पदाधिकारी राहुल कनाल, आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे, शिवसेना पदाधिकारी आणि केबल व्यावसायिक सदानंद कदम आणि एका सीएवर आयकर विभागाने धाड टाकली होती. मुंबई पुणे सांगली, रत्नागिरीत येथे छापे टाकले होते. या सर्व घडामोडी घडत असताना आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक लक्ष्यवेधी ट्वीट केले आहे.

किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधलाय. ‘आयकर विभागाच्या धाडींचे परिणाम: अनिल परब, सदानंद कदम, बजरंग खारमाटे हे कोट्यावधींची रोकड, अपारदर्शक व्यावाकार आणि money laundering मध्ये सहभागी असल्याचे आढळले असं त्यांनी म्हटलंय या प्रकरणी ईडीने कारवाई करावी अशी विनंती सोमय्या यांनी केलीय. तसंच भारत सरकारनेही फौजदारी खटला दाखल केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात परब यांच्या अडचणी वाढणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.