नवाब मलिकांना सुरु झाला पोटदुखीचा त्रास; जेजे रुग्णालयात भरती

मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणले आहे मात्र, आता नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार, मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवाब मलिक यांच्या वकिलांनी ईडीच्या कोठडीदरम्यान तीन मागण्यासांठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार ईडीच्या कोठडीच नवाब मलिकांना औषध आणि त्यांच्या घरातून जेवण देण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसेच, चौकशीवेळी वकिलांना सोबत उपस्थित राहता येणार आहे.

दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा यांनी एकमेकांविरोध आंदोलने केली आहेत. महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकार आणि ईडी विरोधात रान उठवले आहे. तर भाजपाने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, भाजपनेते मोहित काम्भोज यांनी या घडामोडींवर दोन सूचक ट्वीट केले आहेत. त्याची देखील बरीच चर्चा होताना दिसून येत आहे.