‘तू आमदार होणार नाही , तुला माझं लक भेटणारच नाही… तू मला अर्ध अधुरं ठेवलंस ना..तुलाही सगळं अर्धच भेटणार’

सोलापूर : हनीट्रॅपमध्ये अडकलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) सोलापूर (Solapur) (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (resign) दिला आहे. नुकताच देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तातडीने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार श्रीकांत देशमुख यांच्याकडे होता. बेडरुममधील व्हिडिओ आणि तक्रारींनंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता एक ऑडीओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे. जी देशमुख यांचीच असल्याचा दावा केला जात आहे. यात  महिलेने श्रीकांत देशमुख यांना तू मला अर्धअधुरं ठेवलंस ना. तुला सगळं अर्धच भेटणार…तू बनणारच नाही आमदार..लक्षात ठेव असा तळतळाटदिला आहे.

या क्लिपमध्ये ती महिला श्रीकांत देशमुखांना विचारत आहेकी, लग्न का केलंस…तुझा एवढा सुखी संसार होता ना…तू माझ्याशी लग्न का केलंस सांग…तुझा होताना सुखी संसार. तुला एवढं बायकोचं प्रेम आहे. तू मला का बोलला,माझे बायकोशी संबंध नाहीत 3 वर्षेझाली. तू काय काय केलंस कारस्थान. तुझ्याबरोबरही तसंच होणार आहे. तू मला आज वागवतोय ना…तुला माझं लक भेटणारच नाही. तू मला अर्ध अधुरं ठेवलंस ना. तुला सगळं अर्धच भेटणार… तू आमदार होणार नाही असं म्हटलं आहे.

ऑडिओक्लिपमध्ये महिलेने श्रीकांत देशमुखांना तुला एवढं बायकोचं प्रेम आहे तरीही आपल्याबरोबर तू खोटंबोलल्याचं त्या सांगत आहेत. आपल्याला फसवले  गेल्याची भावना असल्यानेच महिलेने त्यामध्ये शेवटीश्रीकांत देशमुखांना तू बनणारच नाही आमदार असा तळतळाट दिला आहे. आणि हीच ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.