Mahadev Jankar | महादेव जानकर परभणीतून निवडणुकीच्या रिंगणात; राष्ट्रवादीच्या कोट्यातून रासपला जागा सोडली

Mahadev Jankar | काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या वाटेवर असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी आपली भूमिका बदलली आहे. महादेव जानकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार यांची भेट घेत आपण महायुतीतच राहणार असल्याचे जाहीर केले. यानंतर आता महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महादेव जानकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली. महादेव जानकर हे परभणीमधून अधिकृत उमेदवार असणार आहेत.

राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा सोडण्यात आल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. त्यामुळे आता परभणीमध्ये महादेव जानकर (Mahadev Jankar) हे लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत. त्यांची लढत शिवसेना ठाकरे गटाच्या संजय जाधव यांच्याशी होणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल