World Kidney Day | मूत्रपिंड आरोग्याविषयी जागरूकतेसाठी मूत्रपिंड विकाराचे 100 रुग्ण, बाणेरचे रहिवासी आणि डॉक्टर यांचा वॉकेथॉन

पुणे| जागतिक मूत्रपिंड दिनाच्या (World Kidney Day) निमित्ताने मूत्रपिंडाच्या विकाराबाबत जागरूकता आणण्यासाठी मणिपाल हॉस्पिटल, बाणेरद्वारे गुरुवार 14 मार्च 2024 रोजी एका वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या 2 किमी वॉकेथॉनची सुरुवात मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथून सकाळी 7:00 वाजता झाली. डॉ. तरुण जेलोका- HOD आणि सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट तसेच डॉ. सौरभ खिस्ते, सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट यांनी सादर वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या वॉकेथॉनमध्ये डायलिसिसचे रुग्ण, मूत्रपिंडाच्या विकारातून बरे झालेले रुग्ण, डॉक्टर, हॉस्पिटलचे कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी यांच्यासह एकूण 100 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला.

या वॉकेथॉनमधील सहभागींना संबोधन करताना मणिपाल हॉस्पिटल, बाणेरचे HOD आणि सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट डॉ. तरुण जेलोका म्हणाले, “मूत्रपिंड रोग ही गुंतगुंतीची स्थिती असते, जी कोणालाही, कोणत्याही वयात ग्रासू शकते. नियमित तपासण्या, लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक काळजी घेतल्यास जीर्ण किडनी स्थिती टाळता येऊ शकते आणि मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारता येऊ शकते. या वॉकेथॉनच्या माध्यमातून लोकांना सक्रिय राहण्यासाठी आणि आपल्या मूत्रपिंडाच्या आरोग्याबाबत सक्रिय पाऊले उचलण्याबाबत आम्ही लोकांना प्रोत्साहित करू इच्छितो.”

या वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखवताना मणिपाल हॉस्पिटल, बाणेरचे क्लस्टर डायरेक्टर आनंद मोटे म्हणाले, “आमचे रुग्ण, डॉक्टर आणि स्थानिक रहिवासी यांच्या सक्रिय सहभागातून हेच दिसून येते की, दिवसाची सुरुवात चालण्याने करून आणि आपल्या जीवनशैलीत छोटे-छोटे पण साधे बदल करून आपल्या एकंदर आरोग्यात फरक पडू शकतो आणि आपण आपले आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतो. या वॉकेथॉनने लोकांना केवळ प्रेरित केले नाही, तर मूत्रपिंडाच्या चांगल्या आरोग्यासाठी पावले उचलण्यास आणि आपल्या समुदायातून जीर्ण किडनी विकाराचा भार कमी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित देखील केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

वॉकेथॉन बरोबरच उपस्थितांना फिजिओथेरपिस्ट आणि डाऐटीशियन मंडळींशी बोलण्याची आणि व्यायाम आणि पोषणाच्या माध्यमातून मूत्रपिंडाचे (World Kidney Day) आरोग्य इष्ट ठेवण्यासाठी सल्ला मिळवण्याची संधी देखील मिळाली.

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | निलेशला मीच पक्षात आणलं, त्याला प्रचंड निधीही दिला, पण…. अजित पवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली

Ajit Pawar | पक्षातून वेगळे झालात, मग शरद पवारांचे फोटो कशाला वापरता? सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले

Nitin Gadkari | नागपूर शहरात २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे