WPL Auction Live: दिप्तीला विकत घेण्यासाठी ४ संघांमध्ये रस्सीखेच, शेवटच्या क्षणी ‘या’ फ्रँचायझीची बाजी; ठरली दुसरी महागडी भारतीय!

WPL Auction 2023 Live Updates: बहुप्रतिक्षित महिला आयपीएल २०२३ चा (WPL 2023) लिलाव मुंबईत दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू झाला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयपीएल लिलाव (WPL Auction) होत आहे. मल्लिका सागर अडवाणी या लिलावकर्ता असून एकूण ४०९ खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले गेले आहे. त्यांपैकी केवळ ९० खेळाडूंना ५ फ्रँचायझींद्वारे विकत घेतले जाईल.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्म्रीती मंधाना यांच्यानंतर अष्टपैलू दिप्ती शर्मा (Deepti Sharma) हिला विकत घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघ दिप्तीला विकत घेण्यासाठी बोली लावताना दिसले. परिणामी ५० लाखांवरुन तिची बोली २ कोटींच्या वर गेली. शेवटच्या क्षणी युपी वॉरियर्स संघाने स्पर्धेत उडी घेतली आणि २.६ कोटींना दिप्तीला विकत घेतली. यासह दिप्ती मंधानानंतर आतापर्यंतची लिलावातील दुसरी सर्वात महागडी भारतीय खेळाडू ठरली.

पहिल्या फेरीतील खेळाडूंवर लागलेल्या बोली-
स्म्रीती मंधाना – RCB, 3.4 कोटी
ऍश गार्डनर- GG, 3.2 कोटी
हरमनप्रीत कौर- MI, 1.8 कोटी
सोफी एक्लेस्टोन- UPW ​, 1.8 कोटी
एलिस पेरी- RCB, 1.7 कोटी
सोफी डिव्हाईन- RCB, 50 लाख
हिली मॅथ्यूज- अनसोल्ड