Balasaheb Thorat | मोदींची गॅरंटी भेदभाव करणारी तर राहुल गांधींची गॅरंटी सर्वसामान्य जनतेला न्याय देणारी

Balasaheb Thorat | नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे पत्रकार परिषदेशाला संबोधित करताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारत जोडो यात्रेसारखे भारत जोडो न्याय यात्रेलाही जनतेचे मोठे समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रात नंदूरबारमध्ये या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. धुळ्यात महिला हक्क परिषदेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि चांदवडच्या शेतकरी मेळाव्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी शेतकरी, कामगार, तरुण, महिला, सर्वसामान्य जनतेला गॅरंटी देत आहेत. मोदींची गॅरंटी भेदभाव करणारी आहे तर राहुल गांधी यांची गॅरंटी मात्र सर्वसामान्य जनतेला न्याय देणारी आहे.

या पत्रकार परिषदेला माजी मंत्री व काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवार, सरचिटणीस ब्रिज दत्त आदी उपस्थित होते.

भारत जोडो न्याय यात्रा आज सकाळी मालेगाव येथून सुरु झाली त्यानंतर चांदवड मध्ये शेतकरी मेळावा झाला. ओझर येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले, दुपारच्या विश्रातीनंतर नाशिकच्या द्वारका चौकातून यात्रा पुन्हा सुरु झाली व इंदिरा गांधी चौकात जनतेला संबोधित करुन राहुल गांधींनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यात्रेचा मुक्काम मोखाडा येथे होईल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?