हिजडेगिरी बंद करा, आमच्या घरात घुसाल तर तुम्हालाही घर आहे, हे विसरू नका – संजय राऊत

नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udahv Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला होता. पण आता मातोश्रीवर जाण्याच्या निर्णयावरुन राणा दाम्पत्याची माघार घेतली आहे.

मातोश्री बाहेर आणि राणा दाम्पत्यच्या घराबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या दिला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी राणा दाम्पत्याला घरातच रोखून ठेवलं होतं. आता माघार घेणार असल्याचं आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत जाहीर केलं. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा मुंबईत दौरा आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी माघार घेत असल्याचं आमदीर रवी राणा यांनी म्हटलं आहे.

आम्ही आमचे आंदोलन संपवत असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची वाटचाल पश्चिम बंगालच्या दिशेने सुरु असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. दरम्यान, या घोषणेनंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला असून राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

दरम्यान,भारतीय जनता पक्ष बायकांना समोर करून श्रीखंडीचे उद्योग करत आहे, हे हिजडेगिरी बंद करा, असा हल्ला शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut on Rana family ) यांनी भाजपवर केला. ते नागपुरात ( Sanjay Raut News Nagpur ) माध्यमांशी बोलत होते. कोणाच्या तरी पाठबळाने आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक स्वस्त बसतील काय? असे म्हणत आमच्या घरात घुसाल तर तुम्हालाही घर आहे, हे विसरू नका, असा इशारा संजय राऊत ( Sanjay Raut News on Navneet Rana ) यांनी दिला.