Yogesh Kedar | शिवसेना शिंदे गट प्रवक्ते पदी योगेश केदार यांची नियुक्ती

मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असलेले तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील योगेश केदार (Yogesh Kedar) यांनी शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना आगामी निवडणुकांन पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते पदी निवड करण्यात आली. जिल्ह्यात सध्या शिवसेनेकडून संभावित उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षण बाबतीत आंदोलने सुरु आहेत या पार्श्वभूमीवर ही निवड विशेष मानली जाते.

योगेश केदार (Yogesh Kedar) हे यापूर्वी माजी खा. छञपती संभाजीराजे यांचे सचिव होते. सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे प्रकल्प मंजूर करून आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. धाराशिव जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय मंजूर करून आणले. धाराशिव आणि लातूर जिल्ह्या करता गॅस पाइपलाइन ची योजना आणली आहे. काही दिवसांपूर्वी तेर येथील गोरोबा काका मंदिराला ‘अ’ वर्ग दर्जा मिळवून दिला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ष निवास स्थानी मराठा आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असणार्या योगेश केदार यांचा पक्ष प्रवेश करून घेतला. त्यांना पक्षाच्या प्रवक्ते पदाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली. मराठा चळवळी बाबत मुद्देसूद भूमिका मांडणारे योगेश केदार हे चळवळ उभी करणाऱ्यां पैकी ते एक आहेत. यांनी मनोज जरांगे यांच्या बाजूने देखील माध्यमांमधून त्यांनी सकारात्मक बाजू लावून धरली होती. आता यापुढे ते मनोज जरांगे आणि सरकार यांच्या मध्ये दुवा साधणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य