Sanjay Raut | गडकरींना अपमानित करण्याच्या उद्देशानेच त्यांच्या उमेदवारीची घोषणा टाळण्यात आली

Sanjay Raut | भाजपने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी घोषित करत प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र असताना महाविकास आघाडीत अजूनही सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. स्वतःच्या आघाडीत काय चालले आहे हे पहायचे सोडून महाविकास आघाडीतील नेत्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव पहिल्या यादीत का घेतले नाही या मुद्द्याचे भांडवल करण्यात जास्त रस असल्याचे दिसून येत आहे.

या मुद्द्यावरून ठाकरे गटाकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज एक अजब तर्क लढवला आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे मोदी शहा यांच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्राचे, नागपूरचे आणि संघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांचा समावेश असलेल्या भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचे नाव असायलाच हवे असा आग्रह ते करु शकले असते.

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्यामुळे महाराष्ट्राची यादी प्रलंबित आहे हा केवळ बहाणा आहे. गडकरींच्या नागपूर मतदारसंघाचा महायुतीच्या जागावाटपाशी कवडीचाही संबंध नाही. गडकरींना अपमानित करण्याच्या उद्देशानेच त्यांच्या उमेदवारीची घोषणा टाळण्यात आली असून या कारस्थानात केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून फडणवीसही आनंदाने सामील झाले आहेत.असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, आता याबाबत त्यांना कुणी माहिती दिली हे मात्र राऊत यांनी सांगितले नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा