Tuljapur News | तिर्थक्षेञी स्वच्छतागृहा अभावी महिलांची होतेय कुचंबणा!

Tuljapur News | स्ञीशक्तीदेवता श्री तुळजा भवानी मातेच्या (Shri Tuljabhavani Mata) वास्तव्याने पुनित झालेल्या तिर्थक्षेञ तुळजापूर नगरीत महिलांसाठीचे शौचालय व स्वछतागृहांची कमतरता देवी दर्शनार्थ येणाऱ्या महिला भाविकांची कुंचबना होत या महिलांच्या प्रमुख समस्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या समस्येने गंभीर रुप धारण केले आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूरला (Tuljapur News) श्री तुळजाभवानी दर्शनार्थ कोट्यावधीभक्त येतात. यात महिला भक्तांची संख्या पन्नास ते साठ टक्के आहे. श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ महिला भक्तांची संख्या वाढली पण स्वछतागृहांची संख्या वाढली नाही. यामुळे महिलांची कुंचबना वाढली.

तिर्थक्षेञी शहरवासियांची व भाविकांची संख्या वाढत असताना स्वछतागृहाची संख्या वाढणे गरजेचे असताना ती कमी होत असल्याचे चिञ सध्या दिसून येत आहे. नगरपरिषदचे असणारे स्वछतागृह शौचालये स्वछ केले जात नसल्याने व पुरेसे पाणी नसल्याने अस्वच्छ बनले आहेत. यामुळे महिला वर्गाची मोठी कुचंबणा होत असल्याने त्यांना उघड्यावर मुलभुत गरज भागविण्यासाठी जावे लागत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

तिर्थक्षेञी कोट्यावधीचे विकास काम झाले. पण यात स्वछतागृह शौचालय माञ झाले नाहीत. काही शौचालयेस्वछतागृह तर बांधल्यानंतर काही महिने चालू झाले नंतर बंद झाली. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे अत्यल्प दरात पे शौचालय स्किम आली पण काही राजकिय पक्षांचा विरोधामुळे ती रद्द झाली. सध्या महिलांना पैसे देवून शौचालय स्वछतागृहाचा वापर करावा लागत आहे. यात याचा फटका गरीब वर्गातील महिला भाविकांना बसत आहे.

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य