उपेक्षित समजाकडे तरुणाईने संवेदनेच्या भावनेने पाहणे आवश्यक : सुनील देवधर

पुणे : सध्याच्या घडीला अनेक अनपेक्षित जागी देखील जिहाद (Jihad) मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामुळेच आपल्या धर्मापासून लांब गेलेल्यांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण होत आहेत. हिंदू समाजाला एकवटविण्यासाठी उपेक्षित समजाकडे तरुणाईने संवेदनेच्या भावनेने पाहणे गरजेचे आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर (Sunil Devdhar) यांनी व्यक्त केले.

धायरी येथील डीएसके विश्व येथे शिववंदना मित्रपरिवार धायरी व न्यू आर्या फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मृती व्याख्यानाच्या सातव्या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुनील देवधर बोलत होते.

या कार्यक्रमाचे आयोजन शिववंदना मित्रपरिवाराचे संस्थापक प्राज भिलारे व वेंकटसाई होंडाचे संतोष कदम यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मंगेश पाटील, शिवशंभू अभ्यासक निलेश भिसे, संतोष देवकर, रत्नाकर फाटक, पुणे शहर भाजपचे सरचिटणीस दीपक नागपुरे, आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सौ. केतकी पांडे यांच्या वतीने २४ शालेय विद्यार्थ्यांनी लाठी-काठी, तलवारबाजी तथा भाल्यांचे प्रात्यक्षिके सादर केली.

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माच्या रक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले. दोन्ही व्यक्तिमत्वे ही केवळ महाराष्ट्राची दैवते नसून त्यांना पूर्ण भारतात पुजले जाते. मात्र, अशा दैवतांच्या नावाने राजकारण केले जाते, हीच दुःखदायक बाब आहे, असे देवधर बोलताना म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार आयोजक प्राज भिलारे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत शिर्के यांनी केले.