जागतिक MSME दिनानिमित्त ‘उद्योग-व्यवसाय कर्ज कार्यशाळेचे’ आयोजन

पुणे: सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी ‘जागतिक MSME दिना’च्या औचित्याने एका विशेष कर्ज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या पाषाण येथील सुप्रसिद्ध सोमेश्वर फाउंडेशन, दे आसरा फाउंडेशन आणि मराठा एंत्रप्रेन्योर असोसिएशन (मराठा उद्योजक संघटना) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे येत्या २५ जून रोजी दुपारी ४ वाजता औंध येथील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृहात हा उपक्रम आयोजित करण्यात आले असून यात उपस्थितांना तज्ज्ञांचे मागर्दशन लाभणार आहे. माजी नगरसेवक तथा प्रसिद्ध युवा उद्योजक सनी निम्हण या कार्यशाळेचे निमंत्रक आहेत.

या उपक्रमात सुप्रसिद्ध बँकिंग फायनान्स तज्ज्ञ तथा कर सल्लागार तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक “विद्याधर अनास्कर’ यांचे तसेच ‘बिझनेस लोन रेडिनेस’ या विषयावर प्रोग्राम मॅनेजर,द आसरा फाऊंडेशनचे “प्रकाश आगाशे’ यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, विद्या सहकारी बँक, तसेच विश्वेश्वर सहकारी बँक यांचा प्रत्येक्ष सहभाग असल्याने या बँकांकडून पाञ उद्योजक व्यवसायिकांना कर्ज मिळणार आहे.

पारंपारिक नोकरीची वाट न धरता अनेक युवकांनी उद्योग – व्यवसाय साकारले आहेत. स्वतःच्या व्यावसायातील यशस्वी टप्प्यानंतर आपल्या उद्योग- व्यवसायाच्या माध्यमातून इतरांना आर्थिक पाठबळ द्यावे या उदात्त हेतूने उद्योग व्यवसाय वाढीसाठी चालना देणारा हा उपक्रम आहे. व्यवसाय उभारणी मध्ये महत्वाचा घटक म्हणजे भांडवल हे भांडवल मिळवून देण्यासाठी मार्केट मध्ये अनेक बँका आणि वित्तीय संस्थामार्फत उद्योग – व्यवसाय साठी  कर्ज सुविधा उपलब्ध आहे. परंतु ते मिळवण्यासाठी नेमके करायचं काय ? कुठली कागदपत्रे लागतात? त्यात पाञ कसे ठरायचे ? फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसाय व उद्योगाच्या विस्ताराकरिता कर्ज उभारणीसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणारा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. तरुण उद्योजकांनी या कार्यशाळेला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन सनी निम्हण यांनी केले आहे.

यावेळी दे आसरा फाऊंडेशनच्या कार्यक्रम व्यवस्थापक वैशाली अपराजित,निधी तज्ज्ञ सुधीर गिजरे,मराठा एंत्रप्रेन्योर असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी www.sunnynimhan.com वर भेट देऊन नावनोंदणी करावी.