2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार; ज्यांच्याकडे या नोटा आधीपासूनच आहेत, त्यांच्याकडे कोणता पर्याय ?

2000 Currency Notes: सरकारने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा करताना आरबीआयने सांगितले की, क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2000 रुपयांची नोट चलनात बंद होऊ शकते परंतु 2000 रुपयांची नोट कायदेशीररित्या वैध राहील. आरबीआयने म्हटले आहे की 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. तसेच, बँका आणि RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा इतर मूल्यांच्या चलनासोबत बदलल्या जाऊ शकतात.

आता प्रश्न असा येतो की आरबीआयच्या या निर्णयानंतर ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आधीपासूनच आहेत, त्यांच्याकडे कोणता पर्याय आहे.

1. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, ते या नोटा बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बँकेच्या शाखेत जाऊन इतर नोटांद्वारे बदलू शकतात.

2 . बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. बँका याबाबत स्वतंत्रपणे नियम जारी करतील.

3. 23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलता येतील.

4. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलू शकतात. आरबीआयने यासंदर्भात बँकांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

5 . 23 मे 2023 पासून, RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत, 2,000 रुपयांची देवाणघेवाण करता येईल.

6. आरबीआयने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करू नयेत असे सांगितले आहे.

7. RBI ने सर्वसामान्य लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्यासाठी वेळ देण्याचे आवाहन केले आहे.