5G तर लॉन्च झाला, पण कोणकोणत्या कंपनीच्या फोनमध्ये वापरता येणार 5G? पाहा संपूर्ण यादी

5G Supported Smartphones: तंत्रज्ञान जसजसे विकसित होत आहे, तसतसे लोकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवाही विकसित होत आहेत. भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी Jio आणि Bharti Airtel ने यावर्षी ऑक्टोबरपासून देशातील काही प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्क सेवा सुरू केली आहे. 5G नेटवर्कचा लाभ घेण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. प्रथम, तुमच्या परिसरात 5G नेटवर्क उपलब्ध असले पाहिजे आणि दुसरे म्हणजे, तुमचा फोन 5G सपोर्टेड असावा.

दूरसंचार कंपन्यांनी हे अनेकदा सांगितले आहे की 4G च्या तुलनेत 5G वापरकर्त्यांना 30 ते 40 टक्के चांगला स्पीड, कॉलिंगचा अनुभव इ. मिळेल. तुम्ही सुद्धा तुमच्या फोनची इंटरनेट सेवा 4G वरून 5G वर स्विच करणार असाल, तर जाणून घ्या भारतात असे किती स्मार्टफोन आहेत जे 5G नेटवर्कला सपोर्ट करतात. एक तर अशी मोबाईल कंपनी आहे, ज्याचा एकच स्मार्टफोन 5G ला सपोर्ट करतो.

जगप्रसिद्ध Apple iPhone
Apple ने अलीकडेच आपल्या iPhone साठी iOS 16.2 अपडेट लाँच केले आहे, त्यानंतर कंपनीच्या अनेक iPhones 5G नेटवर्कला सपोर्ट करू लागले आहेत. यामध्ये iPhone 12 सीरिज, iPhone 13 सीरिज आणि अलीकडेच लाँच झालेली iPhone 14 सीरिज समाविष्ट आहे. यासोबतच तुम्ही iPhone SE Gen थर्ड जनरेशनमध्ये 5G नेटवर्कचा लाभ घेऊ शकता.

सॅमसंग
सॅमसंगने असे अनेक स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे आधीपासून 5G सपोर्ट सॉफ्टवेअरसह येतात. यामध्ये Galaxy S21 सीरिज, Galaxy S22 सीरिज, Galaxy Z Fold 2, Z Fold 3, Z Fold 4, Z Flip 3, Z Flip 4 आणि Galaxy Note 20 Ultra यांचा समावेश आहे.

गुगल पिक्सेल
वापरकर्ते Google Pixel 6 सीरिज आणि Pixel 7 सीरिज या फोनमध्येही 5G नेटवर्कचा लाभ घेऊ शकतील, परंतु यासाठी कंपनीला एक सॉफ्टवेअर अपडेट जारी करावे लागेल जे कंपनी लवकरच लॉन्च करणार आहे.

नथिंग
नथिंग कंपनीने लॉन्च केलेला नथिंग फोन वन हा एकमेव फोन आहे, जो एअरटेल आणि जिओ या दोन्हींच्या 5G नेटवर्कला सपोर्ट करतो.

वनप्लस
OnePlus ने अलीकडेच आपल्या स्मार्टफोन्ससाठी 5G सॉफ्टवेअर अपडेट जारी केले आहे, ज्यानंतर OnePlus 10 Series, OnePlus 9 Series आणि OnePlus 8 Series 5G समर्थित आहेत. यासोबतच OnePlus Nord, Nord 2, Nord 2T, Nord CE, Nord CE 2, Nord CE Lite 2 देखील 5G ​​सपोर्टसह तयार आहेत.

Xiaomi/Redmi/Poco
Xiaomi बद्दल बोलायचे तर Xiaomi mi10 सीरिज, Xiaomi 11 सीरिज, Xiaomi 12 सीरिज स्मार्टफोन 5G सपोर्टसाठी तयार आहेत. redmi बद्दल बोलाल तर Redmi Note 11T 5G, Redmi Note 10T, Redmi Note 11 Pro Plus, Redmi 11 Prime आणि Redmi K50i 5G सपोर्टसह येतात. Poco ची M मालिका आणि F मालिका 5G समर्थित आहेत. यासोबतच Poco X4 Pro 5G सह तयार आहे.

रिअल मी
Realme च्या 10 सीरिज, 8 आणि 9 सीरिज, Realme X, Realme Narjo सीरिज आणि Realme GT सीरिजचे काही स्मार्टफोन 5G समर्थित आहेत.

Oppo
Oppo बद्दल बोलायचे तर Oppo Reno 5G Pro, Reno 6, Reno 6 Pro, Reno 7, Reno 7 pro, Reno 8, Reno 8 Pro सध्या 5G तयार आहेत. याशिवाय Oppo F19 Pro+, Oppo F21 Pro, Oppo F21s Pro, Oppo K10, Oppo A74 आणि Oppo A53s 5G साठी अपडेट केले आहेत.

विवो
चीनी स्मार्टफोन कंपनी Vivo बद्दल बोलायचे तर Vivo X50 Pro, X60, X60 Pro, X60 Pro+, X70, X70 Pro, X70 Pro+, X80 आणि X80 Pro आता 5G साठी सज्ज आहेत. Vivo V20 Pro, V21, V21E, V23, V23 Pro, V23E, V25 आणि V25 Pro देखील 5G ​​साठी तयार आहेत. इतर अपडेटेड मॉडेल्समध्ये Vivo T1, Vivo T1 Pro आणि Vivo Y72 यांचा समावेश आहे.