SRTMUN सिनेट निवडणुकीत 73.40 टक्के मतदान झालं; 16 नोव्हेंबरला निकाल

नांदेड/विनायक आंधळे – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अधिसभा (सिनेट) निवडणूक – 2022 मतदान प्रक्रिया रविवार, दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते दुपारी 5 वाजेपर्यंत पार पडली. निवडणुकीत 10 प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. खुल्या प्रवर्गातून 5 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. तर, एस.सी, एस.टी, ओबीसी, व्ही.जे.एन.टी आणि महिला प्रवर्गातून प्रत्येकी एक उमेदवार असे 5 उमेदवार निवडून द्यायचे आहेत.

सिनेट निवडणुकीत सोशल मिडियाचा आधार घेत अनेक उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे उमेदवारांनी महाविद्यालयांना भेटी सुद्धा दिल्या. यावेळी, त्यांनी पदवीधर मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना मतदानाचे आवाहन केले.

SRTMUN सिनेट निवडणुकीत सरासरी 73.40 टक्के मतदान झालं आहे. एकूण 10 हजार 943 पदवीधर मतदारांपैकी 8033 हजार मतदारांनी मतदान केलं. 16 नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.