शुभमंगल सावधान! केएल राहुल-अथिया शेट्टी अखेर अडकले लग्नबंधनात, दाक्षिणात्य पद्धतीने पार पडला लग्नसोहळा

KL Rahul Athiya Shetty Wedding : बहुचर्चित सेलिब्रीटी कपल अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे अखेर शुभमंगल सावधान झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने त्यांनी लग्न केलं आहे.

अथिया आणि केएल राहुल फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. यात बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. लग्नानंतर केएल आणि अथियाने मनोरंजन आणि क्रिकेटविश्वातील मंडळींसाठी खास भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. यात रिसेप्शनला अनेक उद्योगपती आणि राजकारणीदेखील उपस्थित राहणार आहेत.

अथिया-राहुलची प्यार वाली लव्हस्टोरी
अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अखेर आज ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत.