करमाळा : शेजाऱ्याचं पाणी आलं दारात; मारहाण करत महिलेचा विनयभंग

करमाळा – करमाळ्यातील सिद्धार्थनगर (Siddharthnagar in Karmala) याठिकाणी राहत असलेल्या एका कुटुंबातील घराची पाण्याची टाकी साफ करत असताना, काही पाणी उताराने शेजारील घराच्या अंगणात शिरले. मात्र, आमच्या अंगणात पाणी का शिरले या कारणावरून ज्येष्ठ नागरिक दांपत्यास बेदम मारहाण करून त्यांच्या 40 वर्षीय घटस्फोटित शिक्षिका मुलीचा विनयभंग (Molested)करण्याचा प्रकार शेजाऱ्यांकडून घडला आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात विनयभंगाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (karmala crime)

विविध माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, गौतम कांबळे, मयूर गौतम कांबळे ,दीपक कांबळे (सर्व रा. सिद्धार्थ नगर ,करमाळा) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत पोलिसांकडे सपना यशवंत कांबळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपींवर पोलिसांनी भादवी कलम 354,354 (ए),324,34,323,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सपना कांबळे या शिक्षिका असून त्या निवृत्त शिक्षक असलेल्या आई-वडिलांसोबत सिद्धार्थनगर या ठिकाणी राहतात. तर, गौतम कांबळे हे त्यांचे घराशेजारी राहण्यास आहे. त्यांच्यात यापूर्वी ही किरकोळ कारणावरून आपसात वाद झाले होते. मात्र, त्यांनी अंतर्गत रित्या संबंधित भांडणे मिटवली होती. 28 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता घरातील पाण्याची टाकी सपना कांबळे या स्वच्छ करत होत्या. त्यावेळी काही पाणी शेजारी राहणाऱ्या गौतम कांबळे यांच्या घराच्या अंगणात शिरले, याकारणावरून त्यांनी वाद घालत आमच्या घराच्या अंगणात पाणी सोडायचे नाही असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच हातात घेऊन आलेल्या दगड व काठीने 78 वर्षीय वडील यशवंत कांबळे यांना मारहाण सुरू केली.

सपना कांबळे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडल्या असत्या गौतम कांबळे यांनी त्यांना धरून ठेवत, मयूर कांबळे यांनी त्यांच्या अंगावरील कपडे फाडून मारहाण करून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी दीपक कांबळे ही यांच्या अंगावर धावून आला व त्याने ही मारहाण करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत करमाळा पोलीस अधिक तपास करत आहे.