खळबळजनक : नागपुरात रेल्वे स्थानकावर स्फोटकांनी भरलेली बॅग सापडली

नागपूर – पंजाबमधील मोहाली येथील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयाच्या गेटवर सोमवारी संध्याकाळी रॉकेट हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली असताना आता नागपूर शहरातील मुख्य रेल्वे स्थानक कंपाऊंड परिसरातून सुरक्षा पोलिसांनी एक बॅग जप्त जप्त केली आहे. बॅगमध्ये छोट्या आकाराच्या डिटोनेटर्स (Detonators) आढळून आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

जप्त करण्यात आलेले डिटोनेटर्स खाण (मायनिंग) मध्ये ब्लास्ट करण्याच्या कामात येतात. बॅगमध्ये जिवंत स्फोटके(Explosives in nagpur) असल्याचे निष्पन्न होताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. बीडीडीएस पथकाने स्फोटके भरलेली बॅग ताब्यात घेऊन ती सुरक्षित ठिकाणी हलवली आहे.

लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी संदीप तुमडाम(Lohmarg police station employee Sandeep Tumdam)  यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक काळ्या रंगाचा बॅग दिसली. संदीप यांनी त्या बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये एका डीटोनेटरला 54 जिलेटिनच्या कांड्या वायरने जोडण्यात आल्या असल्याचे दिसताच याबाबत लोहमार्ग पोलीस विभागातील वरिष्ठांना सूचना देण्यात आली. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहेत.