मतदानाला जाताना गॅस सिलिंडरला हात जोडून नमस्कार करा; मोदींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई – देशातील महागाईने सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल (Petrol and diesel) पाठोपाठ घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (LPG cylinder) दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांचा खिसा मोकळा झाला आहे. किचनचे बजेट आणखी वाढले आहे. LPG च्या किमतीत वाढ होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये पीएम मोदी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्यावर महागाईवरून टीका करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) झालेल्या एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींना मतदानाला जाण्यापूर्वी घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरला हात जोडून नमस्कार करावा, असे म्हणताना ऐकू येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा आहे. पीएम मोदी त्या काळाचा संदर्भ देत आहेत जेव्हा काँग्रेस (Congress) सरकारने सांगितले होते की प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात ठराविक प्रमाणात गॅस सिलिंडर दिले जातील आणि ज्यांना निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सिलिंडर हवे असतील त्यांना थोडे जास्त पैसे द्यावे लागतील. या व्हिडीओमध्ये पीएम मोदी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधत म्हणतात की, या लोकांनी गॅस सिलिंडर हिसकावला आणि गॅस सिलिंडर महाग केला. सोशल मीडियावर पीएम मोदींच्या या व्हिडिओवर अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.