पंजाब: मोहालीत इंटेलिजन्स ब्युरोच्या कार्यालयाबाहेर स्फोट

मोहाली – पंजाबमधील मोहाली येथील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयाच्या गेटवर सोमवारी संध्याकाळी रॉकेट हल्ल्यानंतर(Rocket attacks on the gate of the intelligence department headquarters) हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी उशिरा मोहालीमध्ये पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या इमारतीवर रॉकेट हल्ला झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहालीतील पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या इमारतीवर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने (आरपीजी) हल्ला करण्यात आला होता. यादरम्यान मोठा आवाज झाला. हल्ल्यात इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.(Mohali Blast)

मोहाली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, एसएएस नगर येथील पंजाब पोलिस इंटेलिजेंस मुख्यालयात संध्याकाळी 7:45 च्या सुमारास स्फोट झाला. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.