छगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांविरोधात (Chagan Bhujbal Latest News) चेंबुर पोलिसांत (Chembur Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील चेंबुरमध्ये राहणारे व्यावसायिक ललितकुमार टेकचंदानी (Lalit Kumar Tekchandani) यांच्या तक्रारीनंतर भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुजबळ यांच्यासोबतच अन्य दोघांवरही टेकचंदानी यांनी तक्रारीत आरोप केलाय. फोन आणि मेसेजद्वारे धमकी दिल्याचा आरोप उद्योगपती टेकचंदानी यांनी भुजबळांवर केलाय.

आपणास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असे तक्रारदराने पोलिसांनी सांगितले आहे. छगन भुजबळांच्या हिंदू धर्माच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्याचे दोन व्हिडिओ शेअर केल्यामुळे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असेही तक्रारदार टेकचंदानी यांनी तक्रारीत सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.