पेंग्विन सेना म्हणणाऱ्यांना आम्ही चित्ता पार्टी म्हणायचं का?

जालना – युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी देखील भारतात चित्ते आणण्यावरून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.  जालन्यात वरुण सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी वरुणसरदेसाई यांनी मोदी सरकार आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

वरुण सरदेसाई म्हणाले, ‘आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विन आणले यापासून पर्यटकांची गर्दी वाढून महापालिकेचं उत्पन्न वाढलं. मात्र, तेव्हापासून आम्हाला पेंग्विन सेना म्हणून डिवचले. आता यांनी चित्ते भारतात आणले आहे. त्यामुळे भाजपला आता ‘चित्ता पार्टी’ म्हणायचं का ? असा सवाल वरुण सरदेसाई यांनी भाजपला केला.

`मुंबई महापालिका ही महराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई असून भाजप सत्तेत आल्यास अमराठी महापौर होईल आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, अशी शक्यता देखील वरुण सरदेसाई यांनी वर्तवली.