दहशतवादाशी कोणतीही तडजोड नाही हे मोदी सरकारचे सुस्पष्ट धोरण आहे – चित्रा वाघ

मुंबई – मोहालीतील(Mohali) पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयाच्या इमारतीवर रॉकेट हल्ल्याची (Rocket attacks on police intelligence office building) माहिती समोर येत आहे. त्यामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या स्फोट इतका भयंकर होतो की या स्फोटामुळे इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या स्फोटोबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास मोहालीतील पंजाब इंटेलिजन्स कार्यालयाबाहेर(Punjab Intelligence Office)  मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळते. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तसंच, कोणतेही नुकसान झालेले नाही. पंजाब पोलिसांच्या (Punjab Police)इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या इमारतीवर रॉकेटने (rocket)हल्ला करण्यात आला. ज्याने सर्वांनाच गोंधळात टाकले आहे. गुप्तचर विभागाची ही इमारत सुहाना साहिब गुरुद्वाराजवळ आहे.

या हल्ल्यावर आता भाजपनेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, पंजाबमध्ये राज्य सरकारच्या गुप्तचर विभाग कार्यालयावर स्फोटकांनी हल्ला होणे हे देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान आहे. दहशतवाद हा देशाचा शत्रू आहे.राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याचा मुकाबला केला जाईल दहशतवादाशी कोणतीही तडजोड नाही हे मोदी सरकारचे सुस्पष्ट धोरण आहे.असं त्या म्हणाल्या.