रॉंग साईड आलेल्या ट्रकच्या धडकेत न्यायाधीशासह वाहन चालक मित्राचा मृत्यू

लातूर : लातूर मध्ये घडलेल्या एका भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दिवाणी कोर्टाचे न्यायाधीश आणि त्यांच्या चालकाचा समावेश आहे.

उद्धव पाटील हे बीड येथील जिल्हा न्यायालयात दिवाणी ‘ब’ न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) म्हणून कार्यरत होते.लातूर जिल्ह्यातील त्याचे मूळ गाव अजनसोंडा येथे येत असताना त्याच्या कारला भीषण अपघात झाला.. यात ते आणि त्याचा चालक मित्र जागीच ठार झाले आहेत .एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

पानगाव जवळील सेवाग्राम तांड्याजवळ गतिरोधकामुळे ट्रकचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली. समोरून येणाऱ्या उद्धव पाटील यांच्या कारला धडक बसली.. घटनास्थळीच न्यायाधीश उद्धव पाटील आणि वाहन चालक बळी टमके यांचा मृत्यू झाला.एकाच दिवशी गावातील दोन होतकरू तरुण मुलाचे अपघाती निधन झाल्याने पाटील आणि त्यांचे परिवारावर आघात झाला आहे.. आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.