ATM मधून पैसे न निघता, खात्यातून डेबिट झालेत, मग हे करा

डिजिटल युग सुरू झाले आहे, हे युग अतिशय जलद आहे. आपण साधी एक रुपयांची जरी वस्तु घेतली तरी आपण ऑनलाइन पेमेंट हा पर्याय निवडतो. पण अजून देखील अशा लोकांची संख्या मोठी आहे, जे डिजिटल कॅश न वापरता रोख रक्कम जवळ बाळगणे किंवा रोख रक्कमेने व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. आपण अनेकदा एटीएममध्ये जातो आणि कॅश काढतो, पण अचानक आपल्याला मेसेज येतो की आपण रक्कम काढली आहे पण सत्यात मात्र रक्कम हातात आलेली नसते.

अशा वेळेस आपण खूप काळजीत पडतो, आता काय करायचं?बऱ्याचदा एटीएमचा तांत्रिक बिघाड झालेला असतो. किंवा एटीएममधील कॅश संपलेली असते. त्यामुळे तुमचे पैसे कापले जातात. या प्रकरणात काही वेळेनंतर ते पैसे पुन्हा तुमच्या खात्यात जमा होतात. बँकेडुन तुम्हाला तसा मेसेज देखील येतो. पण अनेकदा तुम्ही पैसे न काढता देखील तुमच्या खात्यातील पैसे जाऊ शकतात,एटीएम कार्ड रीडरस्कीम बसवून फसवणूक केली जाते.

चोरटे तुमचे कार्ड हॅक करतात,त्यामुळे नकळत तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात. जर तुमच्या परस्पर पैसे काढले गेले असले तर सर्वात प्रथम बँकेच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.तुमच्या खात्यातून किती पैसे, कोणत्या वेळी गेले यांची व्यवस्थित तक्रार करा. तक्रार केल्यानंतर सात दिवसांच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होणे जरूरी आहे. जर असे नाही झाले तर बँकेला रोज 100 रुपये दंड भरावा लागतो. तसेच बँकेच्या शाखेत जाऊन देखील तुम्ही तक्रार करू शकता.