Nilesh Lanke: निलेश लंके यांच्या पुढे उभा राहतेय नवे आव्हान; जुना सहकारी ठरणार डोकेदुखी?

Nilesh Lanke : पारनेर लोकप्रिय आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरदचंद्र पवार गटाच्या वाटेवर असल्याची चित्रे सध्या दिसून येत आहेत. याचेच ताजे उदाहरण म्हणजे परवा पुण्यामध्ये झालेल्या त्यांच्या कोविड पुस्तकाच्या प्रकाशन वेळी त्यांनी थेट शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन हाती तुतारी घेतल्याचे चित्र दिसून आले आहे. या चित्रामुळे पारनेर तालुक्यामध्ये व सबंध नगर दक्षिण भागात एकच चर्चेला उधाण आलेले आहे ते म्हणजे आमदार निलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी खासदार पदासाठी इच्छुक असून ते खासदार पदासाठी शरद पवार गटाकडून तिकीट घेणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर जर आमदार निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये सामील झाले तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना आमदारकी पदावरून खडसावले आहे. ते म्हणाले की जर निलेश खासदारकी पदासाठी जात असेल तर त्यांना आमदारकी सोडावी लागेल. कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून आमदार पदावर ती कार्यरत आहेत. याच चर्चेनंतर सध्या पारनेर तालुक्यामध्ये आमदारांच्या विरोधकांच्या हालचालीना वेग आलेला दिसून येत आहे.

ह्या हालचाली आमदार निलेश लंके यांची डोकेदुखी होणार हे निश्चित. कारण आमदार निलेश लंके यांचे पूर्वीचे खंदे समर्थक विजुभाऊ सदाशिव औटी हे सध्या पारनेर तालुक्यातील विविध भागात मतदारांच्या गाठीभेटी घेत असून युवा संवाद साधत आहेत. त्यांच्या अडीअडचणी समजून घेत तसेच पारनेरचे भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी भेट घेतल्याचे दिसून येत आहेत. जर पारनेरचे आमदार निलेश लंके हे खासदार पदासाठी उभे राहिले तर त्यांना निश्चितच आमदारकी सोडावी लागेल. जर आमदारकी सोडली तर त्यांच्यासमोर सुजय विखे पाटील यांचे तगडे आव्हान असणार आहे.

जर निलेश लंके हे जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले तरच ते खासदार होऊ शकतात अन्यथा न घर का न घाट का अशी अवस्था होऊ शकते. अशा चर्चांना सध्या तालुक्यात उधाण आलेले असून त्यासंदर्भात विरोधकांच्या हालचाली चालू आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Loksabha Election Dates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्या गोष्टींवर बंदी घालण्यात येते? जाणून घ्या सर्वकाही

मनसेतून राजीनामा देऊनही उपयोग झाला नाही, वसंत मोरे यांचं खासदार बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार?