काश्मीरमध्ये हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुका दिल्या पाहिजेत – मनसे

नवी दिल्ली – काश्मीरमध्ये गेल्या २० दिवसांत आठ हत्या झाल्या आहेत. ज्यामध्ये काश्मिरी पंडित आणि स्थलांतरित हिंदूंचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात टार्गेट किलिंगच्या माध्यमातून बिगर काश्मिरी आणि काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले आहे.

काश्मीरमधील एका कुटुंबाचे अश्रू सुकण्यापूर्वीच आणखी एका हल्ल्याची बातमी येते. दहशतवादी उघडपणे लोकांना मारून दहशत पसरवत आहेत, पण केंद्रातील सरकारला याची कोणतीही चिंता नसल्याचे दिसत आहे. सरकारला जाग आणण्यासाठी आणखी किती निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागतील? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

१९९० च्या दशकात जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आज काश्मीरमध्ये निर्माण झाली आहे. भाजपने काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत आणण्याबद्दल वाचन दिले होते आणि हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवली. मात्र आता जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही.असचं दिसून येत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगमध्ये हिंदूंच्या मृत्यूवरून मनसेचे नेते देखील आक्रमक झाले आहेत. मनसेचे संदीप देशपांडे याबाबत म्हणाले, ज्या पद्धतीने काश्मीर मध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत ते पाहता हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसच बंदुका आणि ते चालवण्याच प्रशिक्षण केंद्र सरकारने दिल पाहिजे. असं देशपांडे यांनी म्हटले आहे.