भर पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब -आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक

मुंबई – राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून, शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान देऊन आज एकनाथ शिंदे सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. अनेक अडचणी समोर असतानाही एकनाथ शिंदेंनी ही किमया करुन दाखवली. दरम्यान, दरम्यान, आजच्या अधिवेशनानंतर राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भर पावसात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

आज मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, अनेक ठिकाणी पाणी तुंबलंय. या अशा पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. शिंदे यांनी पुढे धर्मवीर आनंद दिघे यांच्यासुद्धा स्मृतीस्थळी भेट दिली आणि अभिवादन केले.