Aamir Khan: मनानेही ‘अमिर’! हिमाचल प्रदेशातील आपत्तीग्रस्तांसाठी मिस्टर परफेक्शनिस्टनं केला मदतीचा हात पुढे

Aamir Khan: बॉलीवूड अभिनेता आमिर खानने हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त (Himachal Pradesh Flood) कुटुंबांच्या मदतीसाठी 25 लाख रुपयांची देणगी दिली (Aamir Khan Donated Money) आहे. राज्य सरकारने शनिवारी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. अभिनेत्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की ही मदत पूरामुळे नुकसान झालेल्या लोकांना आधार देईल आणि पुनर्वसन प्रयत्नांना हातभार लावेल.

आपत्तीनंतरच्या वाईट परिस्थितीतून पीडित कुटुंबांना सावरण्यासाठी मदत करणे हे सरकारच्या या प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे. या निधीचा विवेकपूर्वक वापर केला जाईल आणि तो गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यापूर्वी, मुख्यमंत्री सुखू यांनी राज्यातील आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी आपली संपूर्ण बचत 51 लाख रुपये आपत्ती मदत निधीमध्ये दान केली होती.

हरियाणा, बिहार, ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान आणि छत्तीसगडच्या सरकारांनी राज्याला मदत आणि पुनर्वसन उपायांसाठी 65 कोटी रुपयांहून अधिक मदत दिली आहे. मंदिर ट्रस्टशिवाय स्वयंसेवी संस्था आणि इतर लोकही मदतीसाठी पुढे आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हिमाचलमधील रस्ते, पाणीपुरवठा संयंत्रे, इमारती आणि इतर खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई महापालिकेचे भूखंड व उद्याने दत्तक देण्याचे धोरण रद्द करा; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

वंचित बहुजन आघाडीचा Gautam Adani – Sharad Pawar भेटीवरून कॉंग्रेसला टोला !

ससूनमधील रुग्णांना ‘Virtual Reality’द्वारे ‘दगडूशेठ’ बाप्पाचे दर्शन