Sanjay Singh | सहा महिन्यांच्या तुरुंगवासानंतर ‘आप’चे खासदार संजय सिंह यांना जामीन मंजूर

Sanjay Singh | आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. दिल्ली दारू धोरणाशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी ते ६ महिने तुरुंगात होते. न्यायालयाच्या निर्णयानुसार संजय सिंह यांना राजकीय कार्यातही सहभागी होता येणार आहे.

सुप्रीम कोर्टात तीन न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. खंडपीठाने ईडीला विचारले होते की, संजय सिंह यांना अजूनही तुरुंगात ठेवण्याची गरज का आहे? संजय सिंगच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले होते की मनी लाँड्रिंगची पुष्टी झालेली नाही आणि मनी ट्रेल देखील सापडलेला नाही. असे असतानाही संजय सिंह ६ महिन्यांपासून तुरुंगात होते.

संजय सिंग (Sanjay Singh) यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, मनी लाँड्रिंगची पुष्टी झालेली नाही आणि मनी ट्रेल देखील सापडलेला नाही. असे असतानाही संजय सिंह ६ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. अखेर मंगळवारी ईडीने त्यांच्या जामिनाला कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे संजय सिंगांना जामीन मंजूर झाला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका