Athiya Shetty Pregnancy | केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी आहे गरोदर? सुनील शेट्टींच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

Athiya Shetty Pregnancy | बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने नुकतेच प्रसिद्ध डान्स रिॲलिटी शोमध्ये ‘नाना’ बनण्याबाबत टिप्पणी केल्याने सोशल मीडियावर सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यांच्या या कमेंटमुळे मुलगी अथिया शेट्टी गरोदर (Athiya Shetty Pregnancy) असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यानंतर सर्वत्र बातम्या येऊ लागल्या की, अभिनेत्री आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) लवकरच आई-वडील होणार आहेत.

गरोदरपणाच्या सततच्या बातम्यांदरम्यान, सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की अथिया शेट्टी आणि केएल राहुल सध्या कोणत्याही मुलाची योजना करत नाहीत. सूत्राने सांगितले की, ‘या अफवेत तथ्य नाही. सुनील शेट्टी यांनी आजोबा होण्याचे वक्तव्य गंमतीने केले होते. प्रत्येकाने त्यांच्या गंमतीचा चुकीचा अर्थ लावला आहे. अनेकांनी सुनील शेट्टींची संपूर्ण क्लिप पाहिली नसल्याने या अफवा सर्वत्र पसरल्या आहेत.

वास्तविक, डान्स रिॲलिटी शोमध्ये भारती सिंग गंमतीत सुनील सर, तुमच्या मुलीला मुलं झाल्यावर तुम्ही आजोबा व्हाल, त्यानंतर ती कशी वागेल?, असा प्रश्न विचारते. यावर उत्तर देताना सुनील शेट्टी म्हणाले की होय, मी पुढच्या सीझनमध्ये येईन तेव्हा नानासारखा फिरेन. या कमेंटवरूनच तर्कवितर्कांना सुरुवात झाली. आथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचा विवाह 23 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या वडिलांच्या खंडाळा फार्म हाऊसवर झाला होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका