U19 World Cup 2024 IND vs AUS | पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया फायनल! टीम इंडियाकडे विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी

U19 World Cup 2024 Final, IND vs AUS : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना येत्या रविवारी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 1 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानच्या 179 धावांच्या उत्तरादाखल ऑस्ट्रेलियानं 9 गाडी बाद 181 धावा काढून अंतिम फेरीत प्रवेश केला.

या सामन्यात अझान अवेस आणि अराफत मिन्हास यांनी अर्धशतकं झळकावली तर टॉम स्ट्रेकरनं सहा गडी बाद केले. यापूर्वी उदय शरणच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं उपांत्य फेरीत, दक्षिण आफ्रिकेचा दोन गडीराखून पराभव करत अंतिम लढतीत स्थान निश्चित केलं.

अंडर-19 विश्वचषकात (U19 World Cup 2024) आतापर्यंत भारतीय संघ अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. कर्णधार उदय सहारन, सचिन धस, मुशीर खान आणि सौमी पांडे या सर्वांनीच आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. भारताच्या या चार खेळाडूंवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना जिंकण्याची सर्वाधिक जबाबदारी असेल. विशेषत: उपांत्य फेरीत कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांनी दाखवलेला संयम लक्षात घेता खेळी केली होती.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ