हिमाचलमध्ये काँग्रेसला ‘ऑपरेशन लोटस’ची भीती, आमदारांना राजस्थानच्या रिसॉर्टमध्ये हलवले जाऊ शकते

नवी दिल्ली –  हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Himachal Pradesh Election) मतमोजणी सुरू आहे. निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी काँग्रेसला घोडेबाजार होण्याची भीती वाटत आहे. वृत्तानुसार, काँग्रेसला भीती वाटत आहे की, भाजप आपल्या विजयी आमदारांना पळवू शकते, ही भीती आणि तथाकथित ‘ऑपरेशन लोटस’ लक्षात घेऊन काँग्रेसने हिमाचल प्रदेशातील आमदारांना राजस्थानला पाठवण्याची योजना आखली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) आणि ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुडा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा या परिस्थितीवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहेत आणि त्या आज शिमला येथे पोहोचण्याची शक्यता आहे. आज निवडणुकीच्या निकालानंतर जनता पुन्हा भाजपला संधी देणार की काँग्रेसला हे ठरणार आहे.