भाजपचा राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याचा आग्रह होता हे खरं आहे – नवाब मलिक

मुंबई  – सन २०१९ मध्ये भाजपचा राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याचा आग्रह होता हे पवारसाहेबांनी काल सांगितले हे खरं आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

भाजपने सरकार बनवण्याबाबत आग्रह धरल्यानंतर पक्षातंर्गत बैठक होऊन भाजपसोबत सरकार न बनवण्याचा निर्णय झाला आणि हे पवारसाहेबांनी मोदींना संसदेच्या संयुक्त सभागृहात सांगितले त्यावेळी मी उपस्थित होतो हे सत्य आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

राज्यात राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याचा भाजपचा आग्रह होता मात्र या आग्रहाला पवारसाहेबांनी स्पष्ट नकार दिला होता असेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान, आता राष्ट्रवादीने केलेल्या या दाव्यावर भाजपनेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.