“दिल से बुरा लगता है” फेम यूट्यूबर देवराज पटेलचे अपघाती निधन, व्यक्त होतेय हळहळ

Devraj Patel Died In Accident: छत्तीसगडमधील प्रसिद्ध यूट्यूब कॉमेडियन देवराज पटेल (Devraj Patel) याचा काल लभंडीजवळ एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. अनियंत्रित भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात YouTuber देवराज पटेल याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रायपूरच्या तेलीबंधा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. या घटनेनंतर देवराज पटेलच्या चाहत्यांमध्ये शोकांतिका पसरली आहे.

आरोपी ट्रक चालकाला अटक
पोलिसांनी आरोपी ट्रक चालक राहुल मंडल, वय 25, शीतला पारा पखंजूर याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागबहरा दवपाली येथील देवराज पटेल हा त्याचा मित्र राकेश मनहर याच्यासोबत दुचाकीवरून जात असताना अग्रसेन धामजवळ दुचाकीचे हँडल ट्रकच्या बाजूने आदळले आणि दुचाकी अनियंत्रितपणे खाली पडली. यादरम्यान देवराज ट्रकच्या चाकाखाली आला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले
देवराजच्या निधनावर मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, “दिल से बुरा लगता है” द्वारे आम्हा सर्वांना हसवणारा आणि करोडो लोकांमध्ये आपले स्थान निर्माण करणारा देवराज पटेल आज आपल्याला सोडून गेला. एवढ्या लहान वयात एवढ्या अप्रतिम प्रतिभेचा पराभव होणे अत्यंत दुःखद आहे. देव त्याच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांतीः.