सत्ताधारीच बंद कसा पुकारु शकतात ?, महाराष्ट्र बंदविरोधात वकिलाची हायकोर्टात धाव

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या बंद संदर्भात व्यापाऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.

दरम्यान, आता मुंबईतील एका वकिलाने आजच्या महाराष्ट्र बंदविरोधात मुंबई हायकोर्टाच्या सरन्यायाधीशांना विनंती अर्ज केला आहे. कोर्टाने या बंदबाबत स्वत: दखल घ्यावी अशी विनंती अॅडव्होकेट अटल बिहारी दुबे यांनी हायकोर्टाला केली आहे.

सत्तेत असलेल्या सरकारची जाबाबदारी सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत अधिकराचं रक्षण करण्याची आहे. मात्र महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आला आहे. म्हणून हायकोर्टाने स्वतः दखल घेत सामान्य जनतेच्या मूलभूत अधिकरांचं रक्षण करावं अशी मागणी अॅडव्होकेट अटल बिहारी दुबे यांनी मुंबई हायकोर्टाच्या प्रमुख न्यायाधीशांकडे केली आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकारने निव्वळ ढोंगीपणा केला आहे. या नेत्यांना शेतकर्‍यांप्रति खरोखर कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हे देखील पहा