मोदींकडून केंद्रीय तपास यंत्रणांची पाठराखण; महाविकास आघाडीवर अप्रत्यक्ष टीका करत म्हणाले,…

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीती नेत्यांकडून केंद्रीय यंत्रणाकडून दबाव आणल्याचा आरोप केला जात आहे. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी विरोधकांकडूनच केंद्रीय तपास यंत्रणावर दबाव आणला जात आहे, असा पलटवार केला आहे.

पाच राज्याच्या निवडणुकांचा (Five State Election results 2022) निकाल लागला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपने आपले गड शाबूत राखल्याबद्दल मोदींनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी यावेळी काँग्रेसच्या घराणेशाहीपासू ते महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडीविरोधातल्या राजकारणापर्यंत सर्वांचा समाचार घेतला.

मोदी म्हणाले, भ्रष्टाराचाविरोधात कारवाई व्हावी की नाही? पण काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत.लोकांच्या मनात अशा भ्रष्टाचाऱ्यांबाबत एक प्रकारचा राग आहे. भाजप 2014 मध्ये एक इमानदार सरकारचं आश्वासन देत निवडणूक लढवली. 2019 ला पुन्हा आम्हाला जनतेनं सत्तेत बसवलं. देशाला आमच्याकडून अपेक्षा आहे की आम्ही भ्रष्टाचार संपवावा. पण आज आम्ही पाहतो की ज्या निष्पक्ष संस्था आहेत, ज्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करतात, तर हे लोक त्या संस्थांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. असा आरोप यावेळी मोदींनी केला. हे देशाचं मोठं दुर्भाग्य आहे की घोटाळ्यात बरबटलेले लोक आता या संस्थांवर दबाव बनवत आहेत. हे लोक या संस्थांना रोखण्यासाठी नवे नवे पर्यात शोधत आहेत. त्यांना न्यायपालिकेवरही विश्वास नाही.