ब्रेकिंग : शिंदे गटातील ‘हा’ मातब्बर नेता आता फक्त ८ दिवसच मंत्रिपदावर राहणार ?

छत्रपती संभाजीनगर –  राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात संभाजीनगरचे ज्येष्ठ शिवसेना(ठाकरे गट )  नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केलाय.    संदीपान भुमरे फक्त आठ दिवस पालकमंत्री राहणार आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर लिहून घ्या.. असा दावा ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. चंद्रकांत खैरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे.

नेमकं काय म्हणाले खैरे ?

त्याने सव्वा २ कोटी रुपयांची गाडी घेतली. १२ दारूची दुकानं घेतली. एकिकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला निर्व्यसनी होण्याचा सल्ला दिला. ज्या पैठणचे भूमरे हे आमदार आहेत, त्या संतांच्या भूमीत एकनाथ महाराजांनी व्यसनांचे दुष्परिणाम सांगितले. तिथल्याच आमदाराने १२ दारुची दुकानं विकत घेतली आहेत. त्यामुळे लवकरच त्याच्यामागे ईडी लागणार असल्याचं भाकित चंद्रकांत खैरे यांनी वर्तवलंय. मी उन्हात उभा आहे, सुर्याच्या साक्षीने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने सांगतो, संदीपान भुमरे फक्त आठ दिवस पालकमंत्री राहणार आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर लिहून घ्या.