‘नथुराम गोडसेने गांधींची हत्या केल्यानंतर पेढे कुणी वाटले होते? गुलाल कुणी उधळले?’

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उत्तर सभेतील आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही गुरूवारी एकापाठोपाठ 14 ट्विट करत पवारांवर निशाणा साधला आहे. कलम 370, हिंदू दहशतवाद, इशरत जहाँ, काश्मीर फाईल्स, मुंबई बॉम्बस्फोट आदी मुद्यांवरून फडणवीसांनी पवारांना लक्ष्य केलं आहे.

एका ट्विट थ्रेडच्या माध्यमातून फडणवीसांनी शरद पवार यांनी वेगवगेळ्या विषयांवर केलेलं भाष्य आणि त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत या सर्वांची बाबासाहेबांच्या विचाराशी सांगड घातलीय. एका ट्विटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा कलम ३७० ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून घेताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आज डॉ. आंबेडकर जयंती असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम 370 ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून घेताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर फडणवीस यांनी उपस्थित प्रश्नचिन्ह केले. यावेळी काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून अलिकडेच शरद पवार यांनी केलेल्या विधानांचाही समाचार घेतला. तसेच नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या विधानाचेही स्मरण करून दिले.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. १९९३ ला शरद पवार १२ बॉम्बस्फोटांच्या ऐवजी १३ बॉम्बस्फोट झाले असं खोटं बोलले होते अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ”जाऊद्या, १९९३ ची आठवण काढू नका. नथुराम गोडसेने गांधींची हत्या केल्यानंतर पेढे कुणी वाटले होते? गुलाल कुणी उधळले? कुठे या सगळ्यांमध्ये जायचं आता काही महिन्यांनी २०२३ येईल. इतिहास खणून सगळ्या गोष्टी उकरू नका. काही विषय तिथल्या तिथे सोडून द्यायचे असतात. ” असं जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं आहे.

इशरत जहाँ प्रकरण असेल किंवा इतर काहीही गोष्टी असतील ते काहीही म्हणोत आम्ही इथे सगळ्या गोष्टींना उत्तरं द्यायला बसलेलो नाही. एवढंच नाही तर काश्मीर फाईल्सवरून टीका करू नका. काश्मीरच्या पंडितांच्या विकासामध्ये तुमचे योगदान किती हे पहिले दाखवावे चित्रपट दाखवून काय होणार? असाही प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांना केला आहे.