Shivajirao Adhalrao Patil : भोसरीत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

Shivajirao Adhalrao Patil : शिरुर लोकसभा मतदार संघातील (Shirur Loksabha) महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांचे भोसरी विधानसभा प्रचार दौऱ्यात जंगी स्वागत करण्यात आले. आढळराव पाटील समर्थक व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी त्यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच त्यांचे फटाक्यांच्या अतिषबाजीत स्वागत केले. तसेच या निमित्त त्यांनी मोशी येथे भेटी-गाठी केल्या आहेत.

यावेळी शिवसेना उपनेते इरफान सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पुणे जिल्हा नियोजन समिति सदस्य विजय फुगे, पिंपरी-चिंचवडचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष अतिष बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यश साने, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट व शिवयोद्धा ग्रुपचे अध्यक्ष गणेश सस्ते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला