उत्पल पर्रीकर यांनी वाढवली भाजपची डोकेदुखी; आता थेट अमित शहाच येणार गोव्यात

पणजी : गोव्याची निवडणूक भाजपने अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक बनवली आहे. कोणत्याही परिस्थितीत पुन्हा राज्यात सत्ता मिळविण्याच्या तयारीत भाजप (Goa BJP) पक्ष असून, याला बळकटी येण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ३० जानेवारीला गोवा दौऱ्यावर येणार आहेत. ते या दौऱ्यात गोव्यातील जनतेशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. उत्पल हे पणजीतून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे भाजपमधील तणाव वाढला आहे. भाजपकडून सातत्याने त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जात असला तरी. पण उत्पल आपल्या निर्णयावर ठाम आहेत. दरम्यान, या दौऱ्यात पर्रीकर यांची नाराजी दूर केली जाईल अशी शक्यता आहे.

एएनआयशी बोलताना रवी म्हणाले की, मनोहर पर्रीकर यांनी नेहमीच भाजपच्या विजयासाठी काम केले आहे. उत्पल पर्रीकर यांना त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती करतो, असे ते म्हणाले. रवी पुढे म्हणाले की, केवळ भाजपच जनतेला स्थिर सरकार देऊ शकते.