राष्ट्रवादीच्या पोस्टरवरून अजित पवारांचे छायाचित्र गायब, काय आहेत नेमके संकेत?

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षात सर्व काही सुरळीत सुरू नाही का आणि ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, बुधवारी (२३ जून) दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या पोस्टरमध्ये अजित पवार यांचे फोटो दिसत नव्हते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीचे छायाचित्र शेअर केले. या चित्रात दिसत असलेल्या पोस्टरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची छायाचित्रे आहेत, परंतु महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार दिसत नाहीत. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून (LOP) मुक्त करून पक्ष संघटनेत भूमिका द्यावी, असे म्हटले होते.एबीपी न्यूज ने याबाबत वृत्त दिले आहे.