Central Govt | सरकारी नोकर भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेतले गैरप्रकार रोखणारं विधेयक 2024 लोकसभेत मंजूर

Central Govt  : सरकारी नोकर भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेतले गैरप्रकार रोखणारं विधेयक 2024 काल लोकसभेत मंजूर करण्यात आल. सार्वजनिक प्रवेश परीक्षा प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या विविध अवैध बाबी, फसवणूक आणि भ्रष्टाचार रोखण हा यामागचा मुख्य उद्देश्य आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भरती मंडळ, राष्ट्रीय चाचणी संस्था आणि केंद्र सरकारच्या (Central Govt ) विभागांद्वारे घेतलेल्या परीक्षांमध्ये घोटाळे रोखण्यासाठी यात तरतूद आहे. प्रवेश परीक्षे दरम्यान होणाऱ्या विविध अनुचित प्रकारांमध्ये, प्रश्नपत्रिका विविध माध्यमांद्वारे फोडणे, कॉपी करणे, तयार उत्तर पत्रिका उमेदवारपर्यंत पोहचवणे, संगणक प्रणालीत बिघाड करणे, परीक्षांची खोटी प्रवेशपत्र वाटणे, फसवणूक करून सरकारच्या नावाने खोट्या परीक्षा घेणे, खोटी नियुक्ती पत्र देणे आदि अवैध धंद्याना या विधेयकामुळे चाप बसणार आहे.

अशा अनैतिक व्यवहारात सहभागी होऊन परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवर मात्र कारवाईची कोणतीही तरतूद यामध्ये नाही. त्यांच्यावरील कारवाई ही त्या संबंधित परीक्षा मंडळा मार्फत करावी अशी तरतूद करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या गुन्ह्यासाठी गुन्हेगारांना तीन ते दहा वर्षांपर्यंत कारावास आणि दहा लाख तेएक कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकाअंतर्गत सर्व गुन्हे दखलपात्र, अजामीनपात्र असतील. याअंतर्गत तडजोडीद्वारे तोडगा काढता येणार नाही.

या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग (Jitendra Singh) म्हणाले की, या कायद्याद्वारे विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या हिताच रक्षण करण्यात आल असून, सर्व प्रकारच्या फसवणुकीपासून रोखण हा त्यामागचा उद्देश आहे. तसंच या सार्वजनिक परीक्षांच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करून सरकारशी गद्दारी करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा करण यामुळे शक्य होणार आहे.

केंद्र सरकारचा देशातील संघ राज्य व्यवस्थेवर विश्वास असून, या विधेयकाद्वारे केंद्र सरकार परीक्षांच केंद्रीयकरण करून याबाबत कोणताही राज्यावर अंकुश ठेवू इच्छित नाही असंही जितेंद्र सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं. या विधेयकामुळे विविध राज्यात विविध प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण जास्त सोईच होईल असही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

Breaking! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच; निवडणूक आयोगाचा निर्णय

निखिल वागळेंच्या अडचणी वाढणार? पत्रकाराविरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार

Jitendra Awhad | ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय?