दरवाजा बंद करूनच पाहा ‘या’ वेब सीरिज, बोल्डनेसच्या पार केल्यात सर्व मर्यादा!

आजकाल लोक मनोरंजनासाठी टीव्ही आणि थिएटरपासून दूर ओटीटीकडे जात आहेत. ओटीटीवर चित्रपट आणि वेब सिरीजची भरमार आहे. दुसरीकडे, आजकाल निर्माते वेब सीरिज प्रसिद्ध करण्यासाठी कंटेंटसह बोल्ड सीन्सचा वापर करत आहेत. ओटीटीवर अशा अनेक वेब सिरीज आहेत, ज्या बोल्ड कंटेंटने परिपूर्ण आहेत. बोल्ड कंटेंटमुळे प्रेक्षकांमध्येही या वेब सीरिज भरपूर प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र अशा वेब सीरिजचा तुम्ही एकटे बसून आनंद घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मुलांसोबत किंवा कुटुंबासोबत अशा वेबसिरीज पाहू शकत नाही. तर कोणत्या आहेत त्या वेब सीरिज? (Top 4 Bold Web Series)

xxx अनसेंसर्ड
बोल्ड वेब सिरीजमधील पहिले नाव XXX Unsensored चे येते. ही वेब सीरिज 2018 मध्ये ऑल्ट बालाजीवर रिलीज झाली होती. रागिनी एमएमएस चित्रपटाप्रमाणे या वेब सीरिजमध्येही बोल्डनेस कमालीचा जोडण्यात आला आहे. यामध्ये सुप्रसिद्ध टीव्ही कलाकार शंतनू माहेश्वरी, अंकित गेरा, ऋत्विक धनजानी पहिल्यांदाच बोल्ड सीन करताना दिसले.

मिर्झापूर
मिर्झापूर वेब सीरिजमध्ये गँग आणि गुन्हेगारीसोबतच बोल्ड सीन्सही दाखवण्यात आले आहेत. कालिन भैय्याच्या पत्नीचे सासऱ्याशी नाते असो किंवा मुन्ना त्रिपाठीचे नेत्याच्या मुलीशी. या मालिकेत पंकज त्रिपाठी, अली फजल, विक्रांत मॅसी, दिव्येंदू शर्मा, रसिका दुग्गल आणि श्वेता त्रिपाठी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मिर्झापूरचा तिसरा सिझनही याच वर्षी रिलीज होणार आहे.

मस्तराम
या वेब सिरीजमध्ये एका साध्या मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. त्याला लेखक व्हायचे आहे पण त्याने लिहिलेल्या कथा अगदी साध्या आहेत. मग त्याला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे आणि तो बोल्ड मॅगझिनसाठी कंटेंट लिहू लागतो. त्याच्या मॅगझिनसाठी लिहिलेल्या या कंटेटला बोल्ड सीनद्वारे वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. या वेब सीरिजमधील प्रत्येक एपिसोडमध्ये बोल्ड सीनच्या मर्यादा ओलांडलेल्या दिसतात.

गंदी बात
अल्ट बालाजीवरील एकता कपूरची ही वेब सिरीज खूपच बोल्ड आहे. या वेब सीरिजमध्ये समाजात पसरलेल्या त्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, ज्यावर कोणी बोलू इच्छित नाही. या मालिकेत भरपूर सामग्री आहे जी फक्त प्रौढांसाठी आहे.