Akash deep | अवघ्या १० चेंडूत ३ विकेट्स घेत आकाशदीपचे टीम इंडियात स्वप्नवत पदार्पण, त्याची संघर्षकथा करेल भावूक

Akash deep, India Vs England 4th Test : वेगवान गोलंदाज आकाश दीपने 23 फेब्रुवारी 2024 रोजी रांची येथे इंग्लंडविरुद्ध भारतासाठी पदार्पण केले, त्याने पहिल्याच सत्रात आपल्या गोलंदाजीने इंग्लंड संघाचे कंबरडे मोडले. अवघ्या 10 चेंडूत ‘बझबॉल’ खेळत असलेल्या इंग्लंडच्या संघाला मस्ती आकाशने जिरवली. या 10 चेंडूत त्याने 3 बळी घेतले.

पण आकाशचे सुरुवातीचे आयुष्य तितके सोपे नव्हते, 2015 मध्ये 6 महिन्यांतच त्याचे वडील आणि भावाचा मृत्यू झाला. स्ट्रोकमुळे त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला, वडिलांच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी त्याच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला. घरात पैसे नसल्याने आकाशला आईची काळजी घ्यावी लागली. यामुळे त्याला 3 वर्ष क्रिकेट थांबवावे लागले.

या वेळी त्याला समजले की त्याचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न इतके मोठे आहे की तो ते सोडू शकत नाही. यानंतर तो दुर्गापूरला परतला, आणि नंतर कोलकाता येथे गेला, जिथे त्याने एक छोटी खोली भाड्याने घेतली आणि आपल्या चुलत भावासोबत राहू लागला. 27 वर्षीय आकाश दीप हा सासाराम (बिहार) येथील आहे.

नुकतीच टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर आकाशने सांगितले की, त्याच्या एका मित्राने त्याच्या वाईट काळात त्याला खूप मदत केली. या मित्राच्या मदतीने तो पश्चिम बंगालमधील दुर्गापूरला पोहोचला, जिथे त्याला एका क्लबकडून खेळण्याची संधी मिळाली. येथे त्याची कमाई टेनिस बॉल क्रिकेटमधून होती. त्याचे काकाही दुर्गापूरमध्ये त्याच्या मदतीसाठी पुढे आले. यानंतर तो येथून सावरला आणि प्रथम देशांतर्गत क्रिकेट खेळला आणि तेथे खूप घाम गाळला. नुकतीच जेव्हा आकाशची कसोटी संघात निवड झाली तेव्हा त्याचा एकवेळ विश्वास बसला नाही.

जेव्हा वडील आणि भाऊ 6 महिन्यांत मरण पावले
आकाशने अलीकडेच एका संभाषणात सांगितले होते की, त्याचे वडील त्याला बिहार पोलिस कॉन्स्टेबल किंवा राज्य सरकारमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या परीक्षेला बसण्यास सांगायचे. त्या सरकारी नोकऱ्यांचे अर्ज तो भरायचा, पण परीक्षेच्या वेळी तो कोरा फॉर्म भरून परत यायचा. आकाशने 2015 मध्ये 6 महिन्यांत वडील आणि मोठा भाऊ गमावला, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली.

आकाश दीपचा (Akash deep) देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड आहे
आकाश दीपने 2019 मध्येच प्रथम श्रेणी, लिस्ट A आणि T20 देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. आतापर्यंत त्याने आयपीएलचे फक्त 2 हंगाम 2022 आणि 2023 खेळले आहेत. जिथे त्याच्या नावावर एकूण 7 सामन्यात 6 विकेट आहेत. बेंगळुरूने त्याला 20 लाख रुपयांना विकत घेतले होते.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार